|||||……… माय ………|||||

4
471

बायकोनी त्याच्या गालावर जोरात मारली अन् सगळीकडे एकच सन्नाटा पसरला…..
लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच अस झाले..
रोज आपल्याकडून मार खाणारी बायको आज दुर्गा कशी बनली यावर तो अचंभेने व क्रोधाने बघतच राहिला….
दारूचा माज कमी झाल्यावर कोपरऱ्यात रक्त ओकणाऱ्या माये कडे लक्ष गेलं अन् तो पूर्णपणे भानावर आला…
बायकोचे अंग भिजवणारे ते अश्रू त्याला आता ओले वाटू लागले…
तो सावरल्या सावरल्या धावत माये कडं जाऊ लागला पण दारूच्या नशेतला तो धाड् दिशी खाली पडला.
हे सगळं ती रक्तानी माखलेली माय डोळयांनी बघत होती व तिचे डोळे पोराच्या काळजीने व्यापलेले होते…
त्यानं कसाबसा तिचा हात दोन्ही हातात घेतला …
दुसऱी कडे भांडी कपडं करणारी ती भेगा पडलेली हात हातात घेऊन त्याच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले…
मायेच्या चेहऱ्यावर हात फिरवत असताना तिच्या मायेची झळक त्याच्या मनाला स्पर्श करुन गेली….

लहानपणी ‘मला भूक नाही’ असं म्हणून आपल्या वाटेची पोळी त्याच्या पुढे ढकलणारी व स्वतः भूकेनं झोप न आल्यामुळे कड पलटवणाऱ्या मायेची छाया त्याच्या डोळ्यांसमोर लहरुन गेली….
स्वतः साठी एक साडी कमी घेऊन त्याच्या साठी कपडे नेमाने घेणारी माय त्याला आठवली…
त्याला नवीन चपला देऊन स्वतः नंग्या पायानं ऊनात पाय भाजत फिरणारी माय त्याला दिसली…
स्वतः तापात तडफडणारी पण त्याला बरं न वाटल्यास पैसं जुळवून हमखास दवाखान्यात नेणारी माय त्याला कळली…
लहानपणीच वारलेला पण तोपर्यंत मायेला दारू साठी मारणारा बाप, तिची तडफड त्याला स्मरणात आली व त्या वेळी बापाबद्दलचा वाटणारा तो तिरस्कार त्याला आठवला…

तो लगेच भानावर आला…
बापाच्या वाईट वळणावर गेल्याचा पश्चाताप त्याच्या डोळ्यात दिसत होता…
बायकोमध्ये तो आता मायेची छटा शोधू पाहत होता…
मायेची माफी मागण्यासाठी पुढे सरसावला पण तिची हालचाल पूर्ण पणे थांबलेली होती चेहऱ्यावर होते ते फक्त स्मितहास्य…
जणू काही ती माय जातांनाही तिच्या लेकराला काही तरी शिकवून गेली होती….

There are things some i like and some i don’t..
But writing is the thing that i love..
Studying BAMS but Living Ayurveda…

4 COMMENTS

 1. 👌👌😊
  खरतर,
  आईच्या प्रेमाबद्दल लिहाव तेवढे कमीच आहे..
  तरीही तु तुझ्या लेखातून, हे फार उत्तम व मनाला भिडेल अशा पद्धतीने सादर केले.. 😇👍
  खूप छान सुरुवात आहे ही..
  Well done and Keep it up Anant☺👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here